आमच्याबद्दल

आपल्या आर्थिक प्रगतीसाठी विश्वासार्ह सहकारी संस्था

सारस अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., पुणे

आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य असणाऱ्या छोट्या घटकातील व्यक्तींना मध्यमवर्गातील व्यक्तींना बचत करण्याची सवय लावणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सभासदांनी आपल्या भावी वाटचालीत उत्कर्ष आणि सुस्थिती अनुभवण्यासाठी काही ना काही बचत करावी आणि त्याच बरोबर सभासदांच्या आत्ताच्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यासाठी कर्जाच्या रूपात साहाय्य करावे हा पण संस्थेचा उद्देश आहे. बचत करणाऱ्या सभासदांसाठी जास्तीत जास्त परतावा द्यावा व कर्ज घेणाऱ्यांसाठी कमी व्याज आकारावे, अशी संस्थेची मुलभूत भूमिका आहे.

संस्थेचे संचालक मंडळ सामाजिक बांधिलकेच्या नात्यातून विनामोबदला, व्यवस्थापन कार्य पाहत असून संस्थेतील सर्व कर्मचारीही नाममात्र कमी मानधनावर सामाजिक बांधिलकेतून सेवा देण्याचे काम गेली ५० वर्ष करत आहेत. सभासदांची साथ, सभासदांचा विश्वास, सभासदांचा प्रयास आणि समाजाचा विकास या उद्देशाने विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी सारस अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना १५ ऑगस्ट १९७२ रोजी केली.

छोट्या रोपट्यापासून आता बऱ्यापैकी वाढलेल्या छोट्या झाडापर्यंत संस्थेची वाढ झाली आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सारस पतसंस्थेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत व पुढे वाटचाल सुरु आहे.

गेल्या ५३ वर्षात अनेक चांगल्या आठवणी, अनेक उपक्रम, अनेकांचे मार्गदर्शन अनेकांचे साहाय्य, अनेकांचे कष्ट या संस्थेच्या वाढीसाठी उपयोगी पडलेले आहे, सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्यामुळे अनेक छोटे-मोठे उपक्रम संस्था करत असते.

आजच्या मितीला संस्थेचा व्यवहार ८० कोटीच्या जवळपास असून सभासदांची संख्या संस्था १५ हजाराच्या वर आहे संस्थेच्या दोन स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत. कर्वेनगर येथे संस्थेचे मुख्य कार्यालय आहे, तर कुमठेकर रस्ता येथील असलेल्या जागेत संस्थेची शनिपार शाखा आहे. संस्थेच्या शनिपार, कर्वेनगर, कोथरुड, राजगुरुनगर विस्तारित कक्ष या ठिकाणी शाखा आहेत.

आपल्या सभासदांमध्ये अनेक मान्यवर व नामवंत व्यक्तींमध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, जेष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार हे आपले १९७२ पासूनचे सभासद आहेत. तसेच शिक्षण क्षेत्रात तज्ञ, शास्त्रज्ञ व बँकिंग क्षेत्रात मान्यता प्राप्त केलेले अधिकारीही आहेत, लेखक, कवी आणि जवळजवळ असे कोणतेही क्षेत्र नाही की, ज्यात आपल्या संस्थेचे सभासद नाहीत. आपण सर्व सभासदांनी आणि अनेक मान्यवरांनी दिलेल्या स्फूर्तीमुळे, मार्गदर्शनामुळे आणि साहाय्यामुळे तसेच संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळे संस्था गेली ५३ वर्ष कार्यरत असून सातत्याने प्रगती करीत आहे.

गेल्या ५३ वर्षांमध्ये संस्थेला अनेक मान्यवर व्यक्तींनी भेटी दिल्या. त्यात कै. ब. ना. तथा बाबा भिडे, श्री. मदनदासजी, कै.अॅड. बाळ आपटे, श्री. राजेंद्रकुमार घोलप, श्री. त्रिभवन साहेब, श्री. शैलेश कोथमिरे, श्री. गाडे साहेब, श्री. अशोकरावजी मोहोळ, श्री. शिवाजीराव भोसले, श्री. अंकुश काकडे, श्री. अनिल भोसले, श्री. बाळासाहेब अनास्कर, श्री. दिलीप कांबळे, श्री. बाळ पाटील/श्री. मोहनसिंग, डॉ. प्र. चिं. शेजवलकर, श्री. चंद्रशेखर चितळे (सी. ए.), मोहनराव गवंडी (उद्योजक), श्री. विनायकराव जोशी, श्री. तात्या बापट, श्री. दामुआण्णा दाते, श्री. रब्डे भास्करराव, श्री. विजय देव, श्री. श्रीपती शास्त्री, ॲड. बेंद्रे (शहर संचालक), श्रीमती उर्मिला आपटे, श्रीमती वीणा देव, श्री. पद्मनाभ आचार्य यांचा समावेश होतो. एका वर्धापनदिनाला विख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. कामत हे आले होते.

संस्थेला ५३ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि संस्था आजही यशस्वीपणे उभी आहे, याचा आम्ही संचालक, कर्मचारी आणि सन्माननीय सभासद यांना अभिमान आहे आणि असा विश्वास आहे की पुढील येणाऱ्या वर्षांमध्येही संस्थेचे मंडळ हे यापेक्षा चांगली कामगिरी करून संस्था प्रगतीपथावर नेत राहील.

🎯 आमचे ध्येय

प्रत्येक सदस्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.

👁️ आमचे दृष्टीकोन

आधुनिक आणि ग्राहक-केंद्रित बँकिंग सेवा देणे.

का निवडाल आम्हाला?

✔ सुरक्षित व्यवहार

✔ ज्येष्ठ नागरिक घरपोच सेवा

✔ पारदर्शक व्यवहार

✔ ५३ वर्षांची विश्वासार्ह सेवा.

✔ पुण्यातील अग्रगण्य पतसंस्थेकी एक सारस पतसंस्था.

✔ सभासदांना इन्शुरन्स पॉलिसी सेवा

✔ म्युच्युअल फंड सेवा.

आमची कामगिरी

ग्राहक
0 +
वर्षांचा अनुभव
0 +
कर्ज वितरित
0 Cr+
ठेवी
0 Cr+

आजच आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करा

रजि.नं. PNA/BNK/200/स्थापना १५ ऑगस्ट १९७२

मुख्य कार्यालय पत्ता